महाराष्ट्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविज्ञेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण निश्चित करण्यात आलं आहे – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांच्याकडे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण खात आल्यापासून या खात्यामध्ये अमूलाग्र बदल आणि निर्णय झाले आहेत. कोरोनाच्या कठीण काळात अमित देशमुख यांनी खूप कौतुकास्पद काम केले आहे. विलासराव देशमुख यांच्या विकासाचा आणि लोकसेवेचा वारसा अमित देशमुख निभावताना दिसत आहेत असे लोक म्हणत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. कॅबिनेटमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत खासगी योजनेला मान्यता दिली. येणाऱ्या काळात बदल होतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविज्ञेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण निश्चित करण्यात आलं आहे.

राज्यात 18 जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत आहेत आणि 8 जिल्ह्यात महाविद्यालय आणि रुग्णालय यांचे काम प्रगतीपथावर आहे , अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविज्ञेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण वैद्यकीय महाविद्यालय जेथे सुरू झालेलं नाही तेथे फायदा होईल, असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. खासगी संस्था आणि विद्यालय चालवणाऱ्या संस्थांना सोबत घेऊ असंही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी गरज निर्माण झाली आहे ती पूर्ण होईल असंही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले.

Most Popular

To Top