महाराष्ट्र खाकी (नाशिक) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर खालच्या पातळीत वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेदरम्यान त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसेच हक्कभंग होणार नाही, याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचे गांभीर्य पाहून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात आता चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवसैनिक भडकले असून नारायण राणेंवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. बऱ्याच ठिकाणी कोंबडी चोर असे बॅनर बाजी दिसून येत आहे. संतापलेल्या शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून नाशिकमध्ये भाजप कार्यालयाची शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली आहे. तर जुहूमध्येही शिवसैनिकांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे ते चांगळेच अडचणीत सापडले आहेत. राणेंविरोधात राज्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत,नारायण राणेंना अटक करण्याची प्रक्रिया सुरू
- Maharashtra Khaki
- August 24, 2021
- 8:05 am
Recent Posts
IIB NEWS दशरथ पाटील यांच्या IIB च्या अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आणि प्रीमिअम कॅम्पस चे उद्घाटन
January 11, 2025
No Comments
क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून निलंग्यातील तरुणाने संपवले जीवन
January 9, 2025
No Comments
Latur Jilha जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण समितीच्या कामाचा आढावा
January 7, 2025
No Comments
भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी मा. नेहरू देशमुख यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
December 31, 2024
No Comments