लातूर जिल्हा

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा केला

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प दिन गांधी चौक लातूर येथे साजरा केला.गेल्या दीड वर्षापासून भारतावर कोरोनाचे गंभीर संकट आहे. या काळात शेतकरी कष्टकरी हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले, देशोधडीला लागले. दिशाहीन नेतृत्वामुळे देश एका अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे मोठी हानी होऊ शकते असा इशारा देत वेळीच उपाययोजना करा अशी सूचना राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केली होती, परंतु हा जबाबदारीचा सल्ला न ऐकता देशाला हेकेखोरपणाने मरणाच्या खाईत लोटण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले.

जाहिरात

गंगा नदीत मृतदेह तरंगतानांचे भयावह दृश्य जगाने पाहिले पण भाजप सरकारने त्यातूनही काहीच बोध घेतला नाही. आज देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्या विचारांची आणि दुरदृष्टीची गरज आहे. हे लक्षात घेऊन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार लातूरचे पालकमंत्री माननीय अमित देशमुख व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 19 जून हा संकल्प दिवस म्हणून साजरा केला.

Most Popular

To Top