महाराष्ट्र

हडपसर मेट्रोच्या कामांसाठी केंद्र व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार चेतन तुपे पाटील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

महाराष्ट्र खाकी (हडपसर) – पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या विकासात महत्वपूर्ण ठरणारा मेट्रो प्रकल्प साकारण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो मार्गाचा लोणी काळभोर पर्यंत विस्तार करावा. तसेच स्वारगेट ते हडपसर असा मेट्रो मार्ग करण्याची मागणी गतवर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांच्यासह केली होती. यास सकारात्मक प्रतिसाद देत अजित पवार यांनी स्वारगेट ते हडपसर मेट्रो मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे यासंदर्भात पाठपुरावाही मागील वर्षी केला होता. हडपसर मतदारसंघाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या सूचना अजित पवारांनी मान्य केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी मानले आहेत आणि शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो मार्गाचा लोणी काळभोर पर्यंत विस्तार करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. या मार्गांना जोडून स्वारगेट ते सासवड मेट्रो या मार्गाला देखील मंजुरी मिळाली आहे. मेट्रो हडपसरमधून सासवडपर्यंत नेण्यात यावी सर्व मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाणार आहे. या मेट्रो संदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रारुप अहवाल तयार करण्यात आला असून या कामाला सुरुवातही झाली आहे,


जाहिरात

आमदार चेतन तुपे पाटील यांच्या वचननाम्यात दिलेल्या वचनानुसार वचनपूर्तीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे असे हडपसरची जनता म्हणत आहे. हडपसर भागात होणारी वाहतूककोंडीची समस्या देखील यामुळे सुटणार आहे. DPR तयार केल्यानंतर मेट्रोच्या कामाला गती मिळणार आहे.मेट्रो उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पार पडला असून हडपसरच्या विकासात मेट्रोचे महत्वपूर्ण योगदान ठरणार आहे. या मेट्रोच्या कामांसाठी केंद्र व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून आमदार चेतन तुपे पाटील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

Most Popular

To Top