महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा लॉकडाऊन असताना लातूर पोलिसांनी आपली चांगलीच जिम्मेदारी निभावली होती आणि आता अनलॉक झाल तरी पोलीस आपली जिम्मेदारी निभावत आहेत. नवीन विचारांचा आणि तरुण पोलीस अधीक्षक लातूर जिल्ह्याला लाभले आहेत.त्यानी पोलिसांची काम करण्याची पद्धत बदलून पोलिसांची जनमाणसाच्या मनात अगोदर पेक्षा अधीक प्रभावशाली जगा निर्माण केली आहे. लातूर पोलिसांच्या कार्याची दाखल गृहमंत्रालयाने ही घेतली आहे, ही लातूर पोलिसांची कौतुकाची पावती ठरेल. पण लातूर शहरातील काही लॉज आणि रेसिडेन्सियल एरियात चालू असलेल्या वेश्या व्यवसायाने लातूर शहरातील वातावरण खराब होत चालले आहे. आणि पोलिसांच्या कार्याबद्दल संशय लोकांच्या मनात होत चालला आहे असे दिसून येत आहे आणि लोक चर्चा ही करत आहेत.कारण पोलीस बाकी सर्व गुन्हेगारी बाबतीत कडक कारवाई करत आहेत.लातूर जिल्ह्यातून मटका 90% हद्दपार झाला आहे यामुळे नागरिक चांगलेच खुश आहेत. मग हा लॉजवरील वेश्या व्यवसाय का थांबत नही.या वेश्या व्यावसायामुळे तरुण मुले या लॉजकडे जात आहेत. यामुळे पालकांनमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील मुख्य मार्केट मधील एका लॉजवर तर मुलाच्या पाठोपाठ त्याचे वडील ही पोहचले मुलाला रंगेहात पकडले आणि पुढे काय झाल ते वेगळ सांगायची गरज नाही.बदनामीच्या भीतीने त्या पालकाने पोलीसात जाणे टाळले. इतक होऊन ही त्या हद्दीतील पोलीस कारवाई करत नाहीत याचे लोकांना आश्चर्य होत आहे. आता या गोष्टीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे सर्व थांबवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
