पोलीस

पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने सोयाबीन चोरांना 7,54,150 रु मुद्देमालासह केली अटक.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा सोयाबीन लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पिक आहे. या पिकामुळे शेतकरी प्रगतशील झाला आहे. पण काही गुन्हेगारी प्रवत्तीच्या लोकांनी सोयाबीनची चोरी करून गरीब शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम MIDC पोलीस स्टेशन हद्दीत झाला घडली आहे.दिनांक 12/06/2021 रोजी लातूर जिल्ह्यात राहणारे एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील सोयाबीनचे एकूण 419 पोते ट्रक मध्ये भरून MIDC येथील वेअर हाऊस ला पाठविले होते.रात्र झाल्याने ट्रक ड्रायव्हर ने सदरची ट्रक वेअर हाऊस कंपाउंडमध्ये लावून आराम करण्यासाठी घरी गेला व दुसऱ्या दिवशी वेअर हाऊस येथे येऊन पाहिले तेव्हा सदर ट्रकचे ताडपत्री फाडून त्यामधून 70 कट्टे सोयाबीन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले.


त्यावरून फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस ठाणे MIDC येथे गुन्हा रजिस्टर नंबर 329/ 2021 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस अमलदार राजेंद्र देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता.हा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक के.बी.नेहरकर, पोलीस अमलदार राजेंद्र देशमुख , व डी.बी. पथकाचे युवराज गिरी, मदार बोपले, मुन्ना मदने, प्रशांत ओगले, तसेच तांत्रिक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज गायकवाड, पोलीस अंमलदार राजेश कंचे यांचे पथक तयार करून हा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सूचना देण्यात आले होते. हे पथक नमूद गुन्ह्याचा उघडकीस आणण्याच्या दिशेने प्रयत्न करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी
1) संगमेश्वर चंद्रकांत हाके वय 26 वर्ष ,राहणार आसराचीवाडी
2) तानाजी शामराव लिंगे वय 34 वर्ष राहणार हरंगुळ ता. जि. लातूर.
3) अविनाश भाऊसाहेब हाके वय 20 वर्ष राहणार आसरा ची वाडी ह.मु. भांबरी, लातूर
4) किरण गुरुनाथ राठोड वय 22 वर्ष राहणार मोटेगाव ता.रेनापुर ह. मु. भांबरी, लातूर.
5) फिरोज अहमद शेख वय बावीस वर्ष राहणार तालुका निलंगा.ह.मु. भांबरी,लातूर.
यांना त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असून गुन्ह्यात चोरलेला असल्याचे कबूल केला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 70 सोयाबीन किंमत 2, 54,150 /-रुपये व गुन्ह्यात वापरलेला पिकअप असा एकूण 7,54,150/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अमलदार राजेंद्र देशमुख ,सलीम शेख हे करीत आहेत.

Most Popular

To Top