महाराष्ट्र खाकी (आंबेगाव) – पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड या तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे या भागात हॉस्पिटलयुक्त आरोग्य सुविधा वाढविण्याची गरज बरेच दिवसापासून जाणवत होती. आता लवकरच अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील मुलींच्या दोन वसतिगृहांमध्ये राज्यातील पहिले जम्बो कोविड सेंटर होणार आंबेगाव तालुक्यात. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्यसरकार तर्फे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिले जंबो कोविड सेंटर अवसरीत होणार आहे. 288 बेड ,240 ऑक्सिजन बेड,48आयसीयू बेड,40 व्हेंटिलेटर, लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असे सुजज्ज कोविड सेंटर होणार आहे. आंबेगाव,खेड,जुन्नर,शिरूर तालुक्यातील जनतेला याचा लाभ होणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील हे पहिले एवढ्या मोठ्या सुविधा असणारे हे कोविड सेंटर आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता हे ग्रामीण भागातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. 24 कोटी 24 लाख रुपयांचा भरगोस निधी नुकताच राज्यसरकार ने यासाठी मंजूर केला आहे. आंबेगाव तालुक्यात हे होत असताना आसपासच्या तालुक्यांना देखील याचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयासाठी या भागातील दानशूर व्यक्तींनी 34 व्हेटिंलेटर आणि इतर आवश्यक साहीत्य उपलब्ध करुन दिले आहे. नजीकच्या काळात आणखी दानशूर व प्रतिष्ठीत नागरीकांनी, गावांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला पाहीजे, असे आवाहन केले आहे.
