कोल्हापूर शहरात व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण

महाराष्ट्र खाकी ( कोल्हापूर ) – महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या सहकार्यातून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टने सायबर महाविद्यालयातील बॉईज हॉस्टेलमध्ये सुरू केलेल्या मोफत कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या केंद्रात उपचार घेतल्यानंतर रूग्ण 100 टक्के बरे होऊन आपल्या आप्तजनांमध्ये घरी परतावेत, अशी शुभेच्छा डॉ. बलकवडे यांनी दिली.
डॉ. बलकवडे यांनी यावेळी कोविड काळजी केंद्राची पाहणी करून शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, महापालिकेने केलेल्या आवाहनाला व्हिजन ट्रस्टने सकारात्मक प्रतिसाद दिला. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी रूग्णांच्यावर चांगले उपचार होतील. या केंद्राची ऑक्सीजन, इलेक्ट्रीकल आणि फायर ऑडीट झाले आहे. डॉक्टर आणि नर्सींग स्टाफ यांना लसीकरण करण्यात आले आहे.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे, उपायुक्त निखील मोरे, शास्त्रज्ञ धनेश बोरा, मोरया हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या डॉ. संगिता निंबाळकर, डॉ. ऋतुजा मोहिते, उपशहर अभियंता बाबुराव दबडे, पोलीस अमर भोसले उपस्थित होते.

प्रथमच रोबोचा वापर
सायबर पोलीस ठाण्याचे अजय सावंत व जिनय गाडा यांच्या संकल्पनेतून रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. या रोबोच्या माध्यमातून केंद्रातील कोरोना रूग्णांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे. त्याशिवाय पल्स ऑक्सीमीटर, गोळ्या, सॅनिटायझर याबाबतची सेवाही देता येणार आहे. प्रथमच अशा रोबोचा वापर कोविड काळजी केंद्रात होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी दिली. या केंद्रात 40 ऑक्सीजन आणि 140 नॉन ऑक्सीजनचे बेड असून रूग्णांना उपचाराबरोबर मोफत जेवणही देण्यात येणार असून डॉ. निंबाळकर हे सेवा देणार असल्याचेही ते म्हणाले.
ट्रस्टच्या या सेवाभावी उपक्रमाला जिल्हा प्रशासनाने नेहमीच मदत केली आहे. मागील वर्षी या केंद्रातून 1200 रूग्ण बरे होऊन घरी पाठविले असल्याचेही डॉ. निंबाळकर म्हणाल्या.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे