साताऱ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 78 बेडची नवीन सुविधा उभारणी साठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जागेची केली पाहणी

महाराष्ट्र खाकी ( सातारा ) – जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रिडा संकुलात 78 बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, त्याची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. तत्पूर्वी प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपायोजना व रुग्णांवरील उपचारांबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा घेतला.


या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये ऑक्सिजन बेड तसेच आयसीयु बेड वाढवण्याच्या सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्ह्यामध्ये रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्धतेची माहिती घेवून ब्रेक द चेन अंतर्गत जे निर्बंध घातले आहेत त्याची जिल्ह्यात कडक अंमलबजाणी करा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.
जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरच्या कामाची पालमंत्र्यांकडून पहाणी

वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरु असून या कामाची पहाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केली. या सेंटरमध्ये 78 ऑक्सिन बेड असणार आहेत. तर जिल्हा कोविड सेंटरमध्ये आणखीन 20 आयसीयु बेडची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढण्यावर शासनाचा भर असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी पहाणी दरम्यान सांगितले.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे