पोलीस

महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११८ व्या सत्राच्या दीक्षांत संचलन समारंभात मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संबोधन केले.

महाराष्ट्र खाकी (नाशिक) – नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११८ व्या सत्राच्या दीक्षांत संचलन समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधन केले.उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी होते . विशेष प्राविण्य मिळविलेल्या विविध पारितोषिक प्राप्त प्रशिक्षणार्थीचा सन्मान केला .महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास. पदोपदी रूप बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखविलेले धैर्य व शौर्य हे गौरवास्पद असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधन केले.पोलीस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना नियम-कायद्याने वागा. परंतु, कायदा पाळताना तुमच्यातील माणुसकी, बंधुत्वाची भावना हरवू नका. तुम्ही घातलेल्या खाकी वर्दीच्या आत जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टार्स्‌ना किंमत असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Most Popular

To Top