महाराष्ट्र खाकी (पंढरपूर) – पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कोरोना रुग्ण, दिव्यांग आणि 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना टपालाद्वारे आता मतदान करता येणार आहे,अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी काल दिली.
मतदानाची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत राहील.कोरोनामुळे ही निवडणूक आव्हानात्मक असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून ही निवडणूक पार पाडू असे ते म्हणाले. निवडणुकीचे काम काटेकोर व्हावे, मतदानाची टक्केवारी वाढावी आणि गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी विविध सूचना दिल्या असून कोरोना प्रसार रोखण्यासाठी मतदान केंद्रांवर आरोग्य पथकं देखील नेमण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं तपासणी अंती कोरोना प्रतिबंधिक लसीकरण होणार आहे.
